राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर 19 अखेर या रस्त्यांची जरुर ती सर्व दुरुस्ती सह डागडुजी, करावी अन्यथा 01 डिसेंबर 2019 पासून सातारा पुणे रस्त्यांवरील दोन्ही टोल नाक्यांंवरील टोल वसुली करु दिली जाणार नाही असा अल्टीमेटम श्री. छ. उदयनराजे भोसले
सातारा-पुणे राष्ट्रीय महार्मावरील रसत्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून, जवळजवळ सर्वच ठिकाणी एखादया अप्रगत भागातील कच्या रस्त्यां सारखी अवस्थाच या महामार्गाची झाली आहे. या रस्त्यां वरुन प्रवास करणार्या प्रवाशी जनतेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शारीरीक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमधुन होत असलेला उठाव योग्य व समर्थनिय आहे. त्यामुळे रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर 19 अखेर या रस्त्यांची जरुर ती सर्व दुरुस्ती सह डागडुजी, करावी अन्यथा 01 डिसेंबर 2019 पासून सातारा पुणे रस्त्यांवरील दोन्ही टोल नाक्यांंवरील टोल वसुली करु दिली जाणार नाही असा अल्टीमेटम श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकारी व रिलायंन्सला दिला आहे.
टोल विरोधी सातारी जनता,या सामाजिक समुहाकडून, रस्ते दुरुस्त करा सर्व सुविधा द्या, तो पर्यंत सातारा-पुणे रस्त्यांस वरील दोन्ही ठिकाणचे टोल वसुल करु नये अश्या आशयाचा संघर्ष उभारणेत आला आहे. आज या समुह संघटनेच्या वतीने श्री.छ.उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आल्यावर उदयनराजे भोसले यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधीत अधिकारी आणि रिलायन्सचे अधिकारी यांना बोलावून टोलविरोधी जनता या संघटनेचे प्रतिनिधी यांचे समोरच या प्रकरणी विस्तृत चर्चा केली.
चर्चेदरम्यान, सातारा-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी उखडला गेला आहे. काही ठिकाणी उड्डाणपूलाची कामे अजुनही चालु असल्यााने, पर्यायी उपलब्ध केलेला वळण रस्ता हा प्रचंड खराब आहे. महामार्गावर काही ठिकाणी विचित्र प्रकारचे उंचवटे आणि खोलगट स्लोप असल्याने, वाहन धारकांना ते समजत नाही आणि त्या मुळे मोठे अपघात घडत आहेत. याबाबत टोल विरोधी सातारी जनता यांनी सुरु केलेले आंदोलन आणि जनजागृती समर्थनीय आहे. आम्ही स्वतः वेळोवेळी या रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत आवाज उठवलेला आहे. ना.नितिन गडकरी यांना निवेदन,विनंत्या करुन, रस्त्यांच्या सुव्यवस्थे बाबत कायमच भुमिका मांडलेली आहे. त्यामुळे या महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडूजी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत करावी. ती न केल्याीस, दिनांक 01 डिसेंबर 2019 पासून जनतेला बरोबर घेवून, सातारा पुणे रस्त्यांवरील खेडशिवापूर व आनेवाडी हे दोन्ही टोल नाक्यावरील टोल वसुली करु दिली जाणार नाही अश्या कडक शब्दात श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांची कानउघाडणी केली.
चौकट –
या बैठकीच्या वेळी सातारा कोल्हापूर रस्त्यां वरील महाराष्ट्र् राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने टोल वसुली केली जात आहे. त्यात तासवडे आणि किणी या दोन्ही टोलनाक्यांवर चोवीस तासात परत येणार्या प्रवाश्यांसाठी रिटर्न टोल पाऊ ण किंमतीत मिळत नाही. तो प्रवाश्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी अश्या सूचना रस्ते विकास महामंडळाला श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
चौकट – उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या या ठाम आणि ठोस भुमिकेमुळे टोल विरोधी सातारा जनता या सामाजिक संघटनेमध्ये समाधान पसरले आहे. श्री.छ. उदयनराजे भोसले हे सातत्याने जनतेसोबतच राहीले आहेत. जर रस्त्यांसह दुरुस्ती आणि सुधारणा 30 नोव्हेंबर 19 पर्यंत करण्यात आली नाही तर 01 डिसेंबरपासून टोल वसुली करु दिली जाणार नाही अशी उदयनराजेंनीच भुमिका घेतल्याने, कदाचित या प्रकरणात न्यायालयीन दरवाजा ठोठवावा लागणार नाही असे स्पष्ट होत आहे.