पोवई नाका ते शाहू चौक रस्ता पंधरवडयात तयार होणार. साताऱ्यात पॅचिंगला पावसाचे वावडे पालिकेत बैठकांना जोर पोवई नाका ते शाहू चौक या दरम्यानच्या ग्रेड सेपरेटरची पाहणी नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पाहणी केली . येथील स्लॅबचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे येत्या चार दिवसात रस्त्यांचे डांबरीकरण व पिचिंग करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली .
यावेळी पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती विशाल जाधव, सविता फाळके धनंजय जांभळे विठ्ठल बलशेट वार,अभियंता सुधीर चव्हाण, अनंत प्रभुणे बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते . साताऱ्यात पावसाने झालेली रस्त्यांची दूरावस्था आणि पावसामुळे रखडलेली पॅचिंगची कामे या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरची तसेच पोवई नाका ते मरि आई कॉम्प्लेकस या दरम्यानच्या रस्त्यांची नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पाहणी केली .पोवई नाका शाहू चौक या दरम्यानच्या मार्गाचे तातडीने पिचिंग व सपाटीकरणासह डांबरीकरण करून देण्यात यावे अशी आग्रहाची मागणी सातारा पालिकेच्या वतीने करण्यात आली .
रस्ते खुदाईच्या दरम्यान काही दुकाने व हॉटेल्सच्या सांडपाण्याचे व गटारांचे पाईप थेट सेपरेटरच्या आत आल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याची तक्रार करण्यात आली .याशिवाय आयडीबीआय बॅंक कॉर्नरजवळ पाण्याची गळती असल्याने रस्ता पिचिंग करण्यास अडचणी येत असल्याचे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले . ग्रेड सेपरेटरचे मॅन्युएल होलचे लोखंडी गर्डर हे धोकादायक आहेत ते तत्काळ हटवण्याची सूचना उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली .पोवई नाका ते शाहू चौक या रस्त्यांचे येत्या पंधरा दिवसात सपाटीकरण व डांबरीकरण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले . ग्रेड सेपरेटरच्या अंतर्गत भागाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे . चौकट- सातारा शहरातील रस्त्यांचे पॅचिंग तातडीने सुरु करण्याच्या सूचना सातारा विकास आघाडीचे प्रमुख उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी पालिकेला तीन दिवसात केल्या होत्या मात्र अद्यापही पॅचिंगची कामे कागदोपत्रीच रेंगाळली असून त्याला लांबलेल्या परतीच्या पावसाचे कारण देण्यात आले आहे .नगराध्यक्ष माधवी कदम यांनी साताऱ्यात रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांची तातडीची बैठक घेऊन पॅचिंगची कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या .
परतीच्या पावसाचा जोर ओसरल्यानंतर तातडीने काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला . या कामासाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली . मे महिन्यात प्रायोगिक तत्वावर साताऱ्यात प्लास्टिक डांबरचा वापर करण्यात आला होता . मात्र अतिपावसाने सगळेच डांबर वाहून गेले मात्र या डांबराचे पॅचिंग होणार असल्याची माहिती पालिका बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली .