नगरपालिकेच्या नियोजित इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी आयकॉनिक सातारा या राष्ट्रीय स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ

225
Adv

सातारा नगरपालिकेच्या नियोजित इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी आयकॉनिक सातारा या राष्ट्रीय स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ दि12 नोव्हेंबर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे . यावेळी 32 इमारत आराखड्यांचे सादरीकरण होणार आहे अशी माहिती सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

या आराखड्यांचे प्रदर्शन12 व13 रोजी खुले राहणार आहेत . यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आर्किटेक्चर सातारा असोसिएशनचे सुधीर शिंदे, सुहास तळेकर, महेंद्र चव्हाण, मयूर गांधी, ययाती टपळे, उपेंद्र पंडित, विपुल साळवणकर, प्रवीण मोरे, शौनक कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, स्वराली सगरे, सुजाता तळेकर, अनिरूध्द दोशी, हर्षवर्धन टपळे उपस्थित होते . सदर बझार कँप ( विसावानाका ) येथे पालिकेच्या सुसज्ज इमारतीचे आयोजन आहे . इमारतीच्या आराखड्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्याची आलेली सूचना माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी उचलून धरली . त्यानुसार आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ सातारा व सातारा नगरपालिका यांनी तब्बल सहा महिने ठराविक अटी शर्तीवर नियोजित बैठका झाल्या . या स्पर्धाची सुरवात फेब्रुवारी2019 रोजी सुरू झाली . या स्पधेकरिता 188 वास्तुविशारदांनी नोंदणी केली . त्यापैकी 118 जणांनी आपले रेखांकन सादर केले आहे .. वन प्लॉट वन प्रोग्रॅम ही आयकॉनिक साताऱ्याची थीम होती . नितीन किल्लावाला, चंद्रशेखर कानेटकर, संजय पाटील यांनी या स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहिले . स्पर्धातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे अडीच दीड व एक लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्कार दिले जाणार आहे . हा पुरस्कार सोहळा दि 12 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे . सर्वोत्तम बारा आराखड्यांचे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले जाणार आहे .

Adv