Monday, July 6, 2026
spot_img
Home Satara District शिवराज अंडरपास मोठा करावा — खा उदयनराजे भोसले यांना निवेदन

शिवराज अंडरपास मोठा करावा — खा उदयनराजे भोसले यांना निवेदन

141
Adv

संभाजीनगर ग्रामपंचायत आणी विलासपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने NH-4 वरील शिवराज पंप, संभाजीनगर येथे मोठे अंडरपास उभारण्यात यावेत या मागणीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. संभाजीनगर, विलासपूर, खिंडवाडी, समर्थनगर, कोडोली परिसरातील नागरिकांची वाढती वर्दळ तसेच वारंवार होणारे अपघात लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या अंडरपासची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी संभाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच श्री सतीश माने, युवा नेते संग्राम बर्गे, ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल उर्फ राजू पिसाळ, शंभूशेठ पवार, श्री किरण नलवडे, श्री गणेश नलवडे व श्री कौस्तुभ शिंदे उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तत्काळ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच संबंधित विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत शिवराज पंप परिसरातील ब्रिज व अंडरपासचे काम मार्गी लावण्याबाबत निर्देश दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असून लवकरच या कामास सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Adv