Friday, November 13, 2026
spot_img
Home Satara District महायुतीच्या यशात छ उदयनराजेंचा वाटा महत्त्वाचा; जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात योग्य सन्मान मिळणार...

महायुतीच्या यशात छ उदयनराजेंचा वाटा महत्त्वाचा; जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात योग्य सन्मान मिळणार का?

167
Adv

सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थक गटाची भूमिका सातत्याने महत्त्वाची ठरत आली आहे. जिल्हा परिषद निवडणूक, सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक, पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणूक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक; प्रत्येक राजकीय समीकरणात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे गटाचे वजन निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्याच्या राजकारणात विविध ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असूनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे गटाला सत्तेतील प्रमुख पदांवर अपेक्षित स्थान मिळालेले नाही. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजेंच्या राजकीय करिष्म्याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीतील घडामोडींनंतर आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी उदयनराजे गटाला झुकते माप मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या विविध निवडणुकांमधील यशामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरते उदयनराजे गटाचे महत्त्व मान्य न करता सत्तेतील पदवाटपातही या गटाला योग्य सन्मान मिळावा, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील राजकीय समतोल राखताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे गटाचा विचार करणे आवश्यक असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. जिल्हा बँकेच्या चेअरमन किंवा व्हाईस चेअरमनपदापैकी एखादे सन्मानजनक पद या गटाला मिळाल्यास राजकीय योगदानाची दखल घेतल्यासारखे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Adv