Friday, June 5, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अभय जगताप यांना पक्षाचा विसर..?

अभय जगताप यांना पक्षाचा विसर..?

188
Adv

पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अभय जगताप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या अचानक झालेल्या पत्रकार परिषदेवर पक्षांतर्गत नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याचा आरोपही काही पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याची माहिती समोर येत आहे.

पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली!

या घटनेमुळे पक्षातील समन्वय आणि संवाद यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरही अभय जगताप यांच्या भूमिकेवर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पक्षाचे अधिकृत तिकीट मिळूनही पक्ष कार्यालयाशी समन्वय न ठेवता स्वतंत्रपणे हालचाली केल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे “पक्ष कार्यालयाचा विचार का टाळला?” असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Adv