सारंग पाटील दीपक पवार यांचा बार निघाला फुसका* ,
*शिवेंदराजे यांच्या भेटीला हजारो युवक परंतु दीपक पवारांना* *युवकांनी दाखवली पाठ*
सातारा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि सातारा जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले . शिवेंदराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजप मध्ये प्रवेश करून उमेदवारी पटकविल्याने भाजपचे नामदार दीपक पवार यांनी भाजपला ट्रिपल तलाक देत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पटकावली .
राज्यभरातून ट्रॉल झाल्याने सकारात्मक प्रचार सुरू करत शिवेंदराजे यांनी युवा वर्गाला यशस्वी साद घातली . शिवेंदराजे यांच्या कॉलेज भेटीला हजारो युवकांनी हजेरी लावत सेल्फी काढून बाबांना साथ दया हे आवाहन केले .
प्रचारात कसलाही उत्साह न कसला जोर अश्या प्रकारे दीपक पवार यांनी कामाला सुरुवात केली . निवडून येणारच असा साक्षात्कार झाला असल्यासारखे दीपक पवार यांनी वागणे ठेवल्याने भाजप प्रवेशामुळे नाराज झालेला गट शिवेंद्रराजे यांनी पुन्हा वळवण्यात यश मिळवले . लोकसभा पोटनिवडणुकीचा आणि विधानसभेचा प्रचार अतिशय उशिरा आणि नियोजन हीन पद्धतीने दीपक पवार यांनी सुरू केल्याने आणि कॉलेजला भेटी सुरू केल्याने युवा वर्गात प्रचंड संताप दिसत होता . परीक्षेच्या काळात ह्या दीपक पवार यांच्या प्रचार भेटीने युवक पूर्ण नाराज होऊन स्थानिक वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देत होते .