कराड, पाटणच्या विकासात उदयनराजेंचे योगदान मोलाचे-सुनील काटकर

108
Adv

उर्जा निर्मिती, सिंचनातून संपूर्ण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेले कोयना धरण ज्या पाटण तालुक्यात आहे, तेथील जनतेचे प्रश्ने सोडविण्याऐवजी आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे व अनेक महत्त्वाची पदे भूषविणार्‍या व येथील भूमिपूत्र असर्ल्याचे आवर्जून सांगणार्‍या विरोधकांनी आजवर केवळ ही पदे मिरवण्यात व उबविण्‍यातच धन्यता मानली. याउलट पाटणसह कराडच्या विकासात श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बहुमोल योगदान दिले आहे, तर पाटणमध्‍ये केवळ आ. शंभूराज देसाईंनीच उत्‍कृष्ठ संसदपटू होण्‍याचा बहूमान मिळवला आहे, असे जि. प.चे माजी अर्थसभापती सुनील काटकर यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना श्री. काटकर यांनी म्हटले आहे की, कोयना प्रकल्प पूर्ण होवून अर्धशतक लोटले तरीसुध्दा या धरणासाठी घरादाराचा, शेतजमीनीचा त्याग करणार्‍या प्रकल्पतग्रस्तांचे प्रश्न सोडविणे त्या भागाचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या नेतेमंडळींना जमलेले नाही. वास्तविक जनतेचे प्रश्न सुटावेत, ही तळमळच त्यांच्या ठायी नाही. निसर्गाचे भरभरून वरदान लाभले असले तरीही डोंगरदर्‍यात आणि प्राथमिक नागरी सुविधांपासूनही येथील जनतेला वंचित ठेवण्यातच त्यांच्या नेतृत्त्वाने आजवर धन्य‍ता मानली आहे. वास्तविक पाटणच्या भोळ्या भाबड्या जनतेने आजवर सातत्याने पाठराखण करून आणि निरागसपणे विश्वास ठेवूनही काँग्रेस – राष्ट्रवादीच्या तात्कालीन नेतृत्वाने विकासाच्या केवळ पोकळ गप्पाच मारल्या. आपले खासगी प्रकल्प आणि उद्योगधंद्यांच्या उभारणीतच त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. तीच ताकद त्यांनी सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरली असती, तर कदाचित या तालुक्‍यात विकासाचे वेगळे चित्र दिसले असते. सर्वांना पाणी देणार्‍या या भागातील जनतेची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी करण्यात त्यांना कोणता असूरी आनंद मिळाला हेच समजून येत नाही. रस्ते्, पाणी, वीज, आरोग्यय, शिक्षण आदींबाबतच्या कोणत्याही सुविधा देण्यात आ. देसाईंचा अपवाद वगळता तालुक्‍याच्‍या आजवरच्या नेतृत्त्वांने लक्ष घातले नाही. याउलट श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तारळी, मोरणा- गुरेघर, महिंद आदी प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आपले वजन वापरले आहे. तारळी प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पूनर्वसन आणि त्यांना मोबदला मिळावा यासाठी महाराजांसह आ. देसाईंनी केलेले प्रयत्न प्रकल्पग्रस्त कधीच विसरणार नाहीत. ज्यांनी प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्या विस्थापितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम महाराजांनी केले आहे, महाराजांमुळेच तारळी प्रकल्पचग्रस्तांना नुकसानभरपाई मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. याउलट याच तालुक्या्चे सुपूत्र असल्याचा डौल मिरवणार्‍या व लोकसभा सदस्यत्त्व, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री, राज्याचे मुख्‍यमंत्री, राज्यपाल, उच्च पदस्थ व महसूल अधिकारी आदी पदे उबविणार्‍यांनी डोंगरदर्‍यातील बांधवांच्या विकासासाठी सातत्याने उदासीनताच दाखवली, असा आरोपही या वेळी श्री. काटकर यांनी केला.

पाटणप्रमाणेच कराड तालुक्यायतही श्री. छ. उदयनराजेंनी आपल्या संसदसदस्यात्त्वाच्या निधीतून रस्ते, समाजमंदिर, आरोग्य केंद्र, शाळा, वीज आदींच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. थोर नेते व महाराष्ट्रांचे भाग्युविधाते (कै.) यशवंतराव चव्हासण यांच्या प्रीतीसंगमावरील समाधीस्थळाच्या संरक्षकभिंतीसाठी महाराजांनीच भरीव निधी दिला आहे. तसेच कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेसडीअमच्या वृध्दीसाठीही महाराजांनी विशेष लक्ष दिले आहे. याशिवाय कराड- पाटण या दोन्ही तालुक्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी स्थानिक कार्यकत्‍यांना त्यांनी दिलेले पाठबळ संस्मरणीय आहे. खर्‍या अर्थाने जाणते राजे, तळमळीचे लोकप्रतिनिधी म्हाणून श्री. छ. उदयनराजेंनी डोंगरदर्र्‍यात राहणार्‍या जनतेला विकासाच्या वाटा दाखविण्याचे काम केले आहे. तसेच आ. देसाईंनीही विशेष प्रयत्‍नातून विकास घडविला आहे. याउलट अनुभव, शिक्षण, वयोमान यामध्ये ज्येष्ठ- श्रेष्ठ असूनही विरोधकांनी केवळ पदे मिरवण्‍यातच धन्यता मानली असून सर्वसामान्य् जनतेच्या‍ हे आता चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची योग्य वेळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आली आहे. सूज्ञ जनताही आता विकासाचे नवे पर्व उभारणार्‍या श्री.छ. उदयनराजे भोसले व आ. शंभूराज देसाई यांच्‍याच पाठीशी राहिल, असा विश्वासही श्री. काटकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Adv