सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आतापारदर्शकतेचा अभाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे नियोजन सभापती केबिनमध्ये बसूनच कोणावर कारवाई करायची आणि कोणाला सूट द्यायची याची आखणी होत असल्याचे दिसून येत आहे
नियोजन सभापतींच्या केबिनमध्ये काही ठराविक ‘उचापती’ व्यक्तींच्या दबावाखाली अतिक्रमण कारवाई केली जातअसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे त्यामुळे संपूर्ण मोहिमेवरच दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
अतिक्रमण हटाव ही मोहीम सर्वांसाठी समान असावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.शहरात अतिक्रमण हटाव ही मोहीम कायद्याच्या आधारे न होता, काही ठराविक हितसंबंधी आणि उचापतींच्या दबावाखाली चालत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे निवडक लोकांवरच कारवाई करून इतरांना मोकळीक दिली जात असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे सर्वसामान्यवर कारवाईचा बडगा उचलला जात असताना, दुसरीकडे काही मोजक्या लोकांना जाणीवपूर्वक संरक्षण दिले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे संपूर्ण मोहिमेची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे.






