Wednesday, July 15, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय

सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय

156
Adv

सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ झाला. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका सुजाताराजे महाडिक या दोघांमध्ये एका विषयावरून शाब्दिक वाद झाल्यानंतर खासदार गटातील सदस्यांनी सभागृहातून वॉकआऊट केला. त्यामुळे जवळपास तासभर सभेचे कामकाज ठप्प राहिले. त्यानंतर सदस्य परतल्यानंतर अखेरच्या १०मिनिटांत तब्बल २०६ विषयांना मंजुरी देण्यात आली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी हॉलमध्ये दुपारी स्थायी समितीची सभा सुरू झाली.सभा सचिव वर्षा पाटील विषय पत्रिकेचे वाचन करत असताना जयंती कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या साहित्य खरेदी बाबत नगरसेविका सुजाताराजे महाडिक यांनी स्पष्टीकरण मागितले त्यावरून बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी आक्षेप नोंदवत भूमिका मांडली या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली

वाद वाढताच उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्ता बनकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार समर्थक नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट केला. या वॉकआऊटमध्ये नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, मागासवर्गीय विशेष कल्याण सभापती संकेत साठे तसेच नगरसेविका सुजाताराजे महाडिक सहभागी झाल्या.
सभेदरम्यान शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पाणीटँकर विक्रीबाबतही आरोप-प्रत्यारोप झाल्याने वातावरण अधिकच तापले.दरम्यान,भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला

वॉकआऊटनंतर जवळपास तासभर सभा ठप्प राहिली. त्यानंतर सदस्य पुन्हा सभागृहात आल्यानंतर उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात आले. मात्र, शेवटच्या अवघ्या १० मिनिटांत २०६ विषयांना मंजुरी देण्यात आल्याने पालिकेच्या निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या घटनेमुळे सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून, त्याचे आगामी राजकीय परिणाम काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Adv