Thursday, November 26, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गोडोली बागेत उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा!

गोडोली बागेत उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा!

66
Adv

सातारा : भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करत संविधान दिनानिमित्त गोडोली येथील बागेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानाला अभिवादन केले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. संविधानातील विचारांचा अंगीकार करून सामाजिक एकोपा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती.

Adv