Thursday, November 26, 2026
spot_img
Home Satara District Koregaon पैलवान सचिन शेलार यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश

पैलवान सचिन शेलार यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश

228
Adv

सातारा : कोरेगावच्या राजकीय वर्तुळात पैलवान सचिन शेलार यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता चौफाळा, कोरेगाव येथे पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन शेलार यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. शेलार यांच्यासोबत युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघात सचिन शेलार यांचा शिवसेना प्रवेश होत असल्याने या घडामोडीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. युवा कार्यकर्त्यांचे संघटन आणि स्थानिक पातळीवरील संपर्काच्या जोरावर शेलार शिवसेनेत कोणती भूमिका बजावणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कोरेगावच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Adv