Thursday, August 27, 2026
spot_img
Home Satara District Koregaon कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियाना’चा मोठ्या उत्साहात शुभारंभ

कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियाना’चा मोठ्या उत्साहात शुभारंभ

19
Adv

भारतीय परंपरेतील आरोग्यदायी अन्नसंस्काराचे महत्व शालेय बालकांच्या मनावर रुजविणेसाठी प्रयत्न करणे व ग्रामीण भागातील कुटुंबांना रासायनिक घटकांपासून मुक्त, आरोग्यदायी आहार विषयातील जनजागृती करण्यासाठी कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियाना’चा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेले हे अभियान 15 ऑगस्ट पासून सातारा जिल्ह्यात सुरु झाले आहे. या अभियानाच्या अंतर्गत विषमुक्त स्वयंपाकघर ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. या मध्ये विषमुक्त स्वयंपाकघर गावास विशेष बक्षीस दिले जाणार आहे. तसेच अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेश शिंदे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य श्री. हणमंत जगदाळे, सौ. सारिका फाळके, पंचायत समिती सदस्य डॉ. सुरेखा पाटील, गट विकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण आणि सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. लालासाहेब गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गांधीले, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शारदा जाधव, व श्रीमती रब्बना तांबोळी, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक श्री प्रसाद धुमाळ, तालुका व्यवस्थापक, तसेच श्री. सागर वीरकर नगरसेवक, प्रशांत सपकाळ माजी सरपंच, श्री. राजेंद्र भोसले, चेअरमन एकसळ विकास सोसायटी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्याचा पाया स्वयंपाकघरात: डॉ. प्रिया शिंदे
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, “आजच्या काळात वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर दैनंदिन आहारात विषमुक्त अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य हे स्वयंपाकघरावर अवलंबून असते. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि उमेद बचत गटाच्या महिलांनी या अभियानाची मशाल घराघरापर्यंत पोहोचवावी.”

मुख्यमंत्री विषमुक्त अभियानात वॉरियर्स म्हणून काम करुया: आमदार महेश शिंदे
“कोरेगाव तालुक्याला निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी ‘विषमुक्त स्वयंपाकघर अभियान’ हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. निरोगी आरोग्याचा पाया घालण्यात स्वयंपाक घराची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे कृत्रिम रंग आणि त्याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम याबाबत आमदार श्री. महेश शिंदे यांनी उपस्थिताना अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विशेषतः लग्न समारंभ सारख्या कार्यक्रमात अधिक मोठ्या प्रमाणात विषयुक्त अन्नाचा प्रसार होतो ते रोखण्यासाठी या अभियानात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी कृत्रिम रंग मुक्त अन्नपदार्थ खाणे, परसबाग लावणे,स्वयंपाकघरात ज्या अन्नपदार्थांमुळे आजारपण येते असे रासायनिक पदार्थ न वापरणे, त्याचबरोबर या अभियानाचा प्रचार व प्रसार सर्वत्र करणे ची शपथ घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यशासन यांच्या कल्पनेतील निरोगी समाज घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, तसेच उमेद बचत गट प्रवर्तक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती कोरेगाव व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Adv