Tuesday, September 8, 2026
spot_img
Home Satara District Wai महामार्गालगतच्या नागरिकांच्या प्रश्नांवर खा . नितीन पाटील यांची NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक

महामार्गालगतच्या नागरिकांच्या प्रश्नांवर खा . नितीन पाटील यांची NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक

154
Adv

सातारा : पुणे–सातारा तसेच शिरवळ–लोणंद महामार्गालगतच्या नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रमुख अधिकाऱ्यांसोबत खा.नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. शिरवळ, खंडाळा, वेळे, सुरूर, भुईंज, उडतारे आदी परिसरातील स्थानिक नागरिक व मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

महामार्गालगतच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार नितीन काका पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी NHAI चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सचिन गौतम, श्री. पाटील व अधिकारी वर्ग तसेच मा. बकाजीराव पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदयदादा कबुले, अशोक धायगुडे, संभाजी साळुंखे, डॉ. जोगळेकर, राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण, कांतीलाल पवार, आत्माराम नाना सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुधीर पाटील, सुजित जाधवराव यांच्यासह मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

महामार्गाच्या विकासासोबतच महामार्गालगतच्या नागरिकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि दैनंदिन अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस व सकारात्मक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Adv