Friday, November 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City अदालतवाडा ते नगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम थांबली की काय?

अदालतवाडा ते नगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम थांबली की काय?

109
Adv

सातारा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. बोगदा परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली; मग अदालतवाडा परिसरातील अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासनाची कारवाई कधी होणार, असा सवाल सर्वसामान्य सातारकरांकडून उपस्थित केला जात आहे. नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला कधी सुरुवात करणार, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बोगद्यात कारवाई झाली, मात्र अदालतवाडा परिसरात मोहीम पुढे का सरकत नाही? यामागे काही राजकीय दबाव आहे का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे नियोजन सभापती अशोक शेडगे आता अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत काय भूमिका घेतात, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

बोगदा परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती नगरपालिका प्रशासनाने दाखवली, मग अदालतवाडा ते नगरपालिका परिसरातील अतिक्रमणां बाबत प्रशासनाची पावले का थांबली? शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न केवळ निवडक भागांपुरता मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी समान निकष लावून कारवाई होणे अपेक्षित आहे. मग अदालतवाडा ते नगरपालिका परिसराला वेगळा न्याय का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नियोजन सभापती अशोक शेडगे यांच्या भूमिकेकडेही सातारकरांचे लक्ष लागले आहे अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई होणार की राजकीय दबावापुढे प्रशासन माघार घेणार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. बोगद्यातील अतिक्रमणे हटवली, आता अदालतवाड्याची वेळ कधी? की या मोहिमेला राजकीय ब्रेक लागला आहे? असा थेट सवाल सर्वसामान्य सातारकर विचारू लागले आहेत.

Adv