सातारा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. शाहू चौकापासून पुढे चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
चारचाकी वाहनधारकांनी राजवाडा परिसरातील आळूच्या खड्ड्यात तसेच तालीम संघ येथे उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
तसेच राजपथावर चारचाकी वाहने आणि रिक्षा पार्किंग करू नयेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी शक्यतो चारचाकी वाहनांऐवजी दुचाकी वाहनांचा वापर करावा. तसेच वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक शाखेचे सपोनि राजेश माने यांनी केले आहे.






