भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सोमवारी रात्री करंजे आणि सदरबझार येथे कोपरा सभा झाल्या. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, राजू भोसले, लता पवार, मनोज शेंडे, बाळू ढेकणे, शैलजा किर्दत, भाग्यवंत कुंभार, सुवर्णा पाटील, ड्येनी फरांदे, शंकर काका किर्दत, अतुल चव्हाण, ड्येनी पवार, जगन्नाथ किर्दत, अमर इंदलकर, बबन पाटील, सदरबझार येथील सभेस स्नेहा नलावडे, निशांत पाटील, विजय काटवटे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, मिलिंद काकडे, विशाल जाधव, रजनी जेधे, शंकर माळवदे, प्रकाश बडेकर, सुनेशा शहा, बाळासाहेब शिंदे, शरद गायकवाड, संदीप साखरे, भाऊ पवार, चेतन सोळंकी, मनोज सोळंकी, राजू रजपूत, सतीश कांबळे, सागर भिसे, वसिम सय्यद, बबलू जमादार, गणेश भोसले, सुजित जाधव, प्रकाश धुमाळ, राहुल किर्दत, सुनील चव्हाण, उमेश नाईक, जब्बार बागवान, सादिक कुरेशी, नितीन तुपे यांच्यासह सर्व आजी, माजी नगरसेवक उपस्थित होते.
नुकतेच साताऱ्यातील हद्धवाढ, काँक्रीट रस्ते हे प्रश्न मार्गी लागले असून शिवसृष्टी, एमआयडीसीमध्ये नवीन मेगा प्रोजेक्ट, मेडिकल कॉलेज अशी लोकहिताची विकासकामे मार्गी लावण्यासाठी दोन्ही राजें भाजपमध्ये गेले आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राप्रमाणे काही लोक निवडणूक आली कि उगवतात. हे सातारकरांना नवीन नाही. डोळ्यावरच्या द्वेषपट्टीमुळे शिवेंद्रराजेंनी सातारा- जावली मतदारसंघात केलेली विकासकामे यांना कशी दिसतील? फक्त प्रेम, आपुलकी आणि प्रामाणिकपणे केलेलं कामं यामुळेच शिवेंद्रराजे यांचे आणि सातारा- जावलीतील जनतेचे घनिष्ट नाते निर्माण झाले आहे. हे विरोधकांच्या डोळ्यातनेहमीच खुपत असते. मतदारसंघाच्या विकासासाठीच शिवेंद्रराजे कायम बांधिल राहिले असून आगामी काळात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. स्वार्थी विरोधकांना सातारा- जावलीचा झालेला कायापालट बघवत नाही. त्यामुळेच शिवेंद्रराजेनी काहीही केलं नाही, असा पाढा वाचला जात आहे. शिवेंद्रराजेनी काय केल, हे जनते समोर आहे. खोटेनाटे आरोप करून तुमची डाळ शिजणार नाही. २१ तारखेला मतदानाद्वारे जनताच खोटारड्या आणि नाटकी विरोधकांचा पिकनिक दौरा बंद पाडतील आणि त्यांना घरचा रस्ता दाखवतील, असा टोला लगावतानाच सातारा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून दोन्ही राजेंना विजयी करा असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
सदरबझार येथील बेपारी आणि कुरेशी समाज, माघार घेतलेले उमेदवार सागर भिसे, नितीन तुपे यांनी दोन्ही राजेंना पाठिंबा दिला. यावेळी करंजे व सदरबझार येथील स्थानिक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही राजेंना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. शंकर काका किर्दत, राजू राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. गंगाधर फडतरे यांनी आभार मानले. दोन्ही सभांना महायुतीचे सर्व पदाधिकारी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.