सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट असणारे 8 विधानसभा मतदारसंघ व 45-सातारा लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ट असणाऱ्या 6 मतदार संघाची लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी होणारे मतदान हे दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. निवडणूक कर्तव्यसाठी नेमण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करावयाचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
यासाठी ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी नमुना 12 संपूर्ण पोस्टल ॲड्रेससह भरुन संबंधित मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयात दिला आहे, अशा सर्वासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी दि. 20 ऑक्टोबर 2019 रोजी प्रत्येक विधानसभा मतदारंसघनिहाय संविधा केंद्र ठेवण्यात आले असून निवडणूक कर्तव्यावर असलेले सर्व कर्मचारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व सूक्ष्म निरीक्षण, VST/FST/VVT/SST/ Accounting Team, BLO, Vediographer MCC taem अधिगृहीत करण्यात आलेल्या सर्व वाहनांचे चालक, वाहक, मदतनीस,इ. सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय असणाऱ्या सुविधांच्या ठिकाणांच्या तपशिल खालीलप्रमाणे व मतदानाची वेळ सकाळी 6 वा. पासून आहे.
विधानसभा मतदारसंघ 256-वाई द्रविड हायस्कूल, सोनगिरवाडी, वाई, विधानसभा मतदारसंघ 257-कोरेगाव डी.पी. भोसले कॉलेज कोरेगाव, विधानसभा मतदारसंघ 259 कराड (उत्तर) यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह, कराड, विधानसभा मतदारसंघ 260 कराड (दक्षिण) MB-2 शासकीय गोदाम, भेदा चौक, कराड, विधानसभा मतदारसंघ 261-पाटण बी.एङ कॉलेज, पाटण, विधानसभा मतदारसंघ 262-सातारा श्री. छ. शाहू क्रीडा संकुल, सातारा, विधानसभा मतदारसंघ 255-फलटण नविन शासकीय धान्य गोदाम, लक्ष्मीनगर, फलटण, विधानसभा मतदारसंघ 258-माण नविन शासकीय धान्य गोदाम, मायणी रोड, दहिवडी.
Home Satara District निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करावे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल