श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे सातारा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा टोल वसुली करू दिली जाणार नाही असे आव्हान केले होते आता जवळजवळ 80 ते 90 टक्के खड्डे बुजविण्याचे काम झाले असल्याची पोस्ट टोलविरोधी फेसबुक ग्रुप वर फिरत आहे
सातारा ते पुणे महामार्गावर बरेच खड्डे होते खड्डे भरा अन्यथा आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका जिल्ह्यातील मंडळींनी घेतली होती ती रास्त होती त्यालाच प्रतिसाद म्हणून माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधित अधिकारी व टोलनाके संदर्भातील व्यक्तींना सांगितले होते की जर खड्डे वर रस्ते झाले नाही तर टोलवसुली करू दिली जाणार नाही त्याचाच प्रत्यय म्हणून जवळजवळ 80 टक्के रस्ते हे दुरुस्त झाल्याचे चित्र दिसत आहे तशा पोस्टही टोल विरोधी सदस्यांनी स्वतःच्या टोलविरोधी या फेसबूक अकाउंट वरून अपलोड केलेल्या दिसत आहेत
माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आवाहनाला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत जवळ-जवळ खड्डे भरले असून रस्ता ही आता चांगला झाल्याचे टोलविरोधी फेसबुक अकाउंट वरून दिसून येते