जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपोडे बुद्रुक ला ” *तंबाखूमुक्त शाळेचा बहुमान”*

106
Adv

सलाम मुंबई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान तथा तंबाखू मुक्त शाळा अभियान शैक्षणिक वर्ष 2019 -20 अंतर्गत घेतलेल्या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पिंपोडे बुद्रुक चा सर्व निकषात पात्र ठरल्याने ” *तंबाखू मुक्त शाळा*” म्हणून शाळेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सातारा जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर,उपशिक्षणाधिकारी श्री.एच. व्ही.जाधव साहेब, सलाम मुंबई फाऊंडेशन च्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड मॅडम यांच्या शुभहस्ते शाळेचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.शाळेतील तत्कालिन उपशिक्षक व कोरेगाव तालुक्यातील तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे तालुका समन्वयक श्री.किरण यादव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन ही एक सार्वत्रिक बाब होऊन बसली आहे. त्याचे दुष्परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर होत आहेत. शहरी व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी नकळतपणे या व्यसनाच्या अधीन होत आहेत.
याकरिता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवून याद्वारे मुलांना त्यांच्या पालकांना व समाजाला तंबाखू पासून दूर करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.मुलांवर “व्यसनमुक्तीचे संस्कार”करण्याचे काम ही या उपक्रमातून करण्यात आले .निकोटीन हा हानीकारक पदार्थ तंबाखू मध्ये असून तो किती घातक आहे याबाबत विद्यार्थ्यांच्यात जाणीव जागृती केली गेली.यासंबंधीचे 11 निकष शाळेने पुर्ण केलेले आहेत. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शाळेच्या आवारात विद्यार्थी,शिक्षक व येणारे ग्रामस्थ यांनी न करणे, तंबाखू विरोधी फलक शाळेमध्ये असणे, शाळेपासून 100 यार्ड क्षेत्रांमध्ये तंबाखू उत्पादनावर बंदी असणे असे सर्व निकष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळेच शाळेला “तंबाखू मुक्त शाळा” म्हणून गौरविण्यात आले. यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या उपशिक्षक श्री. किरण यादव यांनाही दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका राणी घोंगडे,रमेश चव्हाण, वैशाली चव्हाण, संतोष यादव, सोनल थोरवे, जयश्री जाधव यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल उपसभापती श्री.संजय साळुंखे गटशिक्षणाधिकारी श्री.रवींद्र खंदारे,विस्ताराधिकारी श्री.विशाल कुमठेकर, केंद्रप्रमुख श्री.सर्जेराव धनावडे,सरपंच श्री.नैनेश कांबळे,उपसरपंच श्री.अमोल निकम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मोहन निकम, विकास साळुंखे,पंकज तांबोळी आदींनी अभिनंदन केले.

Adv