जिल्हा परिषद मध्ये नुकतीच नूतन फरशी बसवण्यात आली
असून त्याचे काम निकृष्ट झाल्याचे दिसून येते काही महिन्यापूर्वीच बसवले फरशी खालीवर झाल्याचे दिसून येते
जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील बांधकाम निकृष्ट असल्याने होत असेल तर जिल्ह्यात बांधकामाची काय अवस्था असेल हे आता वेगळे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे संबंधित कामावरून दिसून येते काही महिन्यांपूर्वीच चौथा व ग्राउंड फ्लोअर येथील फरशी चे काम झाले होते त्याच्या सकरटिंग निकृष्ट असल्याचे दिसून येते बांधकाम विभागाच याकडे दुर्लक्ष करत असून नक्की दर्शन लक्ष्मीचे कोणी घेतले की काय अशी कुजबूज जिल्हा परिषद होती
शेकडो नागरिक या रस्त्यावरून ये जा करत असतात अशा निकृष्ट कामामुळे नक्की कोणाची इज्जत जाते हे यावरून कळते मिनी मंत्रालय म्हणून आपण या जिल्हा परिषदे कडे बघत असतो तेथेच असे होत असेल तर जिल्ह्यातील कामांची काय अवस्था असेल का आळीमिळी गुपचिळी तोंडाला कुलूप असेच बांधकाम विभागाचा खेळ चालल्याचे दिसून येते बांधकाम विभागात कोणकोण दर्शन लक्ष्मीच्या घेते हे सर्वांना माहिती पवारां पासून याची सुरुवात होते कुंपणच शेत खात असेल तर यासारखे दुर्दैव कोणाचं नसेल असे म्हणावे लागेल