श्री. सेवागिरी महाराज यात्रेच्या अनुषंगाने कलम 36 लागु

158
Adv

सातारा जिल्ह्यातील पुसेगांव ता.खटाव येथील श्री. सेवागिरी महाराज यात्रा दि.21 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत  साजरी  होत आहे.या यात्रेच्या निमित्ताने रथ – मिरवणुक आयोजित केली जाणार आहे. या कालावधी दरम्यान आयोजीत केले जाणारे विविध कार्यक्रम, मिरवणुका या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे,
मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे यासाठी, तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा. पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दि.21 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीकरीता त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदानकेले आहेत.

Adv