Thursday, June 4, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू

कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू

33
Adv

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींनुसार आणि नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा प्रशासनाने गतिमान पावले उचलली आहेत.

नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. शासनाच्या सूचनेनुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे तसेच मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबत नागरिकांना मार्गदर्शन व येणाऱ्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी ०२१६२-२३२१७५ (02162-232175) हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी यि सुविधेचा लाभ घ्यावा,

असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Adv