Thursday, October 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District सातारा जिल्ह्यात ‘जय हो’चा नारा हळूहळू बुलंद

सातारा जिल्ह्यात ‘जय हो’चा नारा हळूहळू बुलंद

15
Adv

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सातारा जिल्हा परिषदेनंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सत्तासमीकरणातही गोरेंनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि भाजपची राजकीय रणनीती यांच्या जोरावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप विचारांच्या संचालकांचे संख्याबळ वाढवण्याच्या दिशेने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे केवळ सहकार क्षेत्रातील सत्तेची लढाई नसून जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाचीही कसोटी मानली जाते. या निवडणुकीत जागावाटप, उमेदवारांची समीकरणे आणि विविध राजकीय गटांमधील समन्वय यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या पार्श्वभूमीवर भाजप विचारांच्या संचालकांना अधिक संधी मिळवून देण्याच्या राजकीय प्रयत्नांत जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे जिल्हा परिषदेनंतर जिल्हा बँकेतही भाजपची ताकद वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

Adv