सातारा ते लातूर रस्ता रुंदीकरण आणि नूतनीकरण काम गेले दोन वर्षे चालू आहे या कामाकरिता पांढर वाडी ते म्हसवड हद्दीतील ऐकून 1118 झाडे वनक्षेत्रपाल दहिवडी यांचे परवानगीने तोडण्यात आली होती त्या साठी संबंधित ठेकेदार कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे यांनी परवानगी मागितली होती.
यावेळी वनविभागाने हमीपत्र लिहून घेतले होतें की या तोडण्यात येणाऱ्या झाडांसाठी पर्यायी जागेवर मान तालुक्यात सुमारे नवीन 1118 झाडे लावण्यात येणारे होती आणि त्याची देखभाल करण्यात येणार होती परंतु आज दोन वर्षे उलटली तरी कोणत्या ही प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली नाही यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे,तरी येत्या पंधरा दिवसात मान तालुक्यात कत्तल करण्यात आलेली 1118 झाडांचे जागेवर नवीन वृक्षलागवड करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी वनक्षेत्रपाल दहिवडी मुळे साहेब यांचेकडे केली आहे. अन्यथा पर्यावरणवादी कार्यकर्ते सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“रस्ता काम हे विकासकाम केंद्र सरकारचे असून ह्याकामी प्रतिगृहिता म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे यांनी ठेकेदार कंपनी कडून नवीन झाडे लावून घेणे बंधनकारक आहे.त्याकामी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना तातडीने कार्यवाही करणेस कळविले आहे.”