संसदेच्या हिवाळी आदिवेशनाच्या पहिल्याच दिवशी . पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे कौतुक केले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली.
पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . हे पाहता पाहता राज्यामध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्ता स्थापन करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपाचे १०५ आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यामुळेच भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास १५९ आमदार संख्येच्या मदतीने राज्यामध्ये सहज बहुमत सिद्ध करता येईल.
भाजापाला १४ लहान मोठ्या पक्षांच्या आमदारांने पाठिंबा दर्शवला असल्याने एकूण संख्याबळ १७३ पर्यंत जाईल. राष्ट्रवादीने अगदी थेट सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तरी भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत सिद्ध करता येईल. त्यामुळे राष्ट्रवादी थेट किंवा बाहेरुन राज्यात भाजपाला सत्तेस्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकते. राष्ट्रवादीने थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास ते उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाच्या मंत्रीपदांवर दावा सांगू शकतात. तसेच केंद्रामध्येही ते सत्तेत वाटा मागू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.