जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयातील सातव्या मजल्यावर पार पडली आरक्षण सोडत अध्यक्षपदासाठी ओपन पुरुष आरक्षण पुन्हा पडले अनेजणांचे डोळे या पदाकडे आता लागलेले आहेत
अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आरक्षण सोडत ही ओपन पुरुष अशी पडली होती त्यात नंतर श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना संधी देण्यात आली होती आज मंत्रालयात आरक्षण सोडत ही पुन्हा ओपन पुरुष पडल्याने या पदासाठी आता राष्ट्रवादी कोणाच्या नावाची शिफारस करते की पुन्हा श्रीमंत संजीवराजे यांना बढती देते हे बघणे आता उत्सुकतेचे असेल या पदासाठी कराड येथून मानसिंगराव जगदाळे यांचे नाव प्राधान्याने घेतले जात असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विश्वासू मानले जात आहेत
सातारा जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय च आहे या पदासाठी आता कोणाची वर्णी लाग ते याकडे जिल्ह्य वाशी यांचे डोळे लागले आहेत