चूक ही चूकच असते कार्यकर्त्यांनी केली काय आणि मी केली काय माफी मागितली तर पाहिजे ते मी कर्तव्य समजतो निवडणुकीच्या काळात मी जे जे बोललो त्याचे मी आजही समर्थन करतो ज्याला कोणाला सत्ता स्थापन करायची आहे त्यांनी लवकर सत्ता स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक प्रकारे आपण पुन्हा एकदा संसदेत जाणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले
नुतन खासदार पाटील यांनी कोणते तरी ठोस काम करावे त्यामुळे पवार साहेबांचे नावलौकिक होईल असा टोला श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी या वेळी लगावला आता काम करण्याची वेळ नाही जेवहा करायचं होतं तेव्हा केले नाही तेव्हा आमच्या वर खंडणीच्या केसेस टाकल्या पवार साहेब तुम्ही मला मुलासारखे तेव्हा संभाळले असते तर आज मला पक्ष सोडून जाण्याची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली