रस्त्याच्या खड्याने सातारकर मेटाकुटीला आले असताना आज पालिकेकडून रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरू झाल्याने थोडा का होईना श्वास सातारकरांनी सोडला आहे
( पॅचिंग करताना दोन विद्यमान नगरसेविका त्यांच्या पतींच्या उचापती दिसून आल्या नगरसेविका पतींच्या पतींचे तिथे काय काम असा सवाल सातारकर नागरिक एकमेकांशी खाजगीत बोलत आहेत)
नगरपालिका ते समर्थ मंदिर रस्त्याच्या पॅचींगला सातारा पालिकेकडून सुरुवात झाली आहे यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे मुख्याधिकारी शंकर गोरे बांधकाम सभापती सविता फाळके नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे इंजिनीयर अनंत प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते
पालिकेने केलेले पॅचिंग हे रस्ता करेपर्यंत टिकावे तरच त्या पॅचिंगचा उपयोग झाला असे म्हणावे लागेल नाहीतर पुन्हा पाढे पंचावन्न अशी गत व्हायला नको असे सातारकर नागरिक बोलत आहेत