सातारा तालुका पोलिसांकडून 20 लाखाचा गुटखा जप्त

100
Adv

मा. श्री. तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्री. धीरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा तसेच मा. समीर शेख सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा यांनी जिल्हामध्ये अवैदय गुटखा बाळगणारे विरूद्ध्य कारवाई करण्याबाबत मोहिम राबवण्याचे सुचना दिल्याने त्याप्रमाणे मा. मा. श्री. सजन हंकारे पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहापूर ता.जि.सातारा गावी गोवा गुटख्याची वाहतूक होणार आहे.

अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी त्यांचकडील डी.बी. पथकातील पो.हवा. राजू मुलाणी, पो.हवा. दादा परिहार, पो.ना.सुजीत भोसले, पो.कॉ. रमेश चव्हाण, पो.कॉ. संदीप कुंभार यांना सदरबाबत माहिती घेवून कारवाई करणेबाबत सांगितलेने सदर पथकातील पोलीस कर्मचारी यांनी मिळाले माहितीप्रमाणे शहापूर भागामध्ये याठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना आयशर टेम्पो क्र. एम.एच.११ ए.एल.३६५३ यास थांबवून त्याचे हौदयामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गोवा गुटखाचे पांढरे रंगाचे एकूण १४ पोती मिळून आली.

सदर वाहनचालक राहूल वामन माने वय २९ वर्षे रा. शहापूर ता.जि. सातारा याने सदरचा माल विक्रीसाठी आणलेला असल्याचे माहिती दिली. सदरचा माल, आयशर टेम्पो, आरोपी यास ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणण्यात आला. सदरचा गुटखा हा २०,२८,६००/- रूपये किंमतीची असून आयशर टेम्पो ५ लाख रूपये किंमतीचा असा एकूण २५,२८,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरबाबत अनिल अरूणराव पवार वय ३४ वर्षे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन विभाग सातारा यांनी फिर्याद दिली आहे. सदर गन्हयाचा तपास मा. श्री. वर्षा देसाई महिला पोलीस उपनिरीक्षक सातारा तालुका पो.ठाणे हे करीत आहेत.

Adv