न्यायव्यवस्था जलद आणि कठोर व्हावी- सारंगी महाजन

81
Adv

भारतीय संस्कृती काही प्रमाणात पुरुष प्रधान असली तरी महिलांना मातृशक्ती ्महणून मानाचे स्थान आहे जन्माला येणारी व सासरी जाणारी मुलगी घरची लक्ष्मी मानले जाते परंतु आज समाजातील परिस्थिती पाहता स्त्री सुरक्षित नाही हे प्रकर्षाने जाणवत असल्याचे मत सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन यांनी मांडले आहे

बलात्काराच्या घटना आजही कमी होतच नाहीत याला कारण न्यायव्यवस्थेला न्याय देण्यास होणारा विलंब होय मुख्यतः बलात्काराच्या प्रकरणासाठी भारतीय संविधानात काही महत्त्वाच्या तरतुदी असाव्यात आरोपींना कडक शासन होण्यासाठी कायदाही अमलात आणायला हवा सर्वप्रथम बलात्काराची कोणत्या प्रकारची केस जलदगती न्यायालयात चालवायला हवी हे निश्चित व्हायला हवे याशिवाय अशा प्रकरणात किती दिवसात निपटारा व्हायला हवा यासाठी कालावधी निश्चित करण्यात यावा या प्रकरणाचे स्वरूप पाहून त्याच्या खटल्याचा कालावधी हा एक ते दीड महिन्यापेक्षा जास्त असू नये असे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

न्यायालयाने आरोपी अमुक एक व्यक्ती आहे हे सिद्ध झाल्यास शिक्षा देण्यास हरकत नसावी पीडित मुलीच्या कुटुंबीयां न्यायासाठी न्यायालयाकडे मोठ्या विश्वासाने बघतात त्यामुळे यात दिरंगाई होऊ नये त्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी आवश्यक तरतूद करण्याची गरज आहे कोणत्याही राज्यात सामूहिक बलात्कार झाल्यानंतर केंद्र शासनाने ताबडतोब दखल घ्यावी असे मतही त्यांनी मांडले

Adv