ज्योतिर्मय फौंडेशनतर्फे शुक्रवार, दि. सहा डिसेंबरपासून सलग पाच दिवस सातार्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव : 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीताताई केळकर, नगराध्यक्षा माधवी कदम, जि. प. चे सीईओ स॔जय भागवत आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 200 स्टॉल्सच्या माध्यमातून होणार्या भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा लाभ घेण्याचे आणि प्रतिसाद देण्याचे आवाहन या महोत्सवाच्या संयोजिका व फौंडेशनच्या संस्थापिका सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
सलग सातव्या वर्षी फौंडेशनतर्फे हा महोत्सव होत असून एकाच प्रदर्शनात ऑटोमोबाईल्स, कृषी, प्रॉपर्टी, होम अप्लायन्सेस, बचत गटांचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान, या प्रदर्शनात कृषी योजनांची माहिती व शेती प्रात्यक्षिकेही पहावयास मिळणार आहेत. या महोत्सवातील सर्व स्टॉल्स फायबरचे असून प्रदर्शनात फिरण्यासाठी भरपूर जागा आणि सुरक्षारक्षकांद्वारे सुरक्षाव्यवस्थाही पुरविण्यात येणार आहे. शुक्रवारी उदघाटन सोहळ्यानंतर संजय मानके व सहकारी ‘गीत गाता चल’ हा जून्या हिंदी- मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे.
या प्रदर्शनादरम्यान येणार्या ग्राहकांसाठी स्वरसंध्या हा मराठी व हिंदी नव्या- जुन्या सुरेल गितांचा सांगितीक कार्यक्रमही सादर होईल. तसेच शनिवारी संध्याकाळी सहा वाजता महिलांसाठी होम मिनीस्टर हा मनोरंजनपर स्पर्धात्मक उपक्रमाचेही आयोजित केला आहे. तसेच दि. आठ रोजी सायंकाळी सहा वाजता उल्लेखनयी कामगिरी केलेल्या महिलांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर संदीप रोकडे, माजी पोलिस आयुक्त डी. एन. जाधव, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य प्रबंधक महादेव शिरोळकर, भाजप प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य अँड. भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमवार, दि. 9 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘सरगम; द फ्युजन बँड’ हा संगीत कार्यक्रम होईल. मंगळवार, दि. 10 रोजी मंगळागौरीची गीते आणि नृत्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. याशिवाय
स्वागत कमानी, प्रशस्त पार्किंग आणि संपूर्ण राज्यभरातून येणारे विविध उद्योग- व्यवसायांचे स्टॉल्स ही या महोत्सवाची वैशिष्ट्ये असून इच्छुक व्यावसायिक, बचत गट यांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 02162- 237660 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी सौ. पाटील यांच्यासह ज्योर्तिमय फौंडेशनच्या सौ. स्मिता शिंगटे, सौ. निर्मला पाटील, अॅड. सौ. अंजूम मणेर, सौ. सीमा भाटीया, सौ. राजश्री दोशी, सौ. दीप्ती पवार, सौ. सईदा नदाफ, सौ. रेणूका शेटे, सौ. मल्लीका पुजारी, सौ. नीलम राजपूत, सौ. राधिका पाटील व सहकारी सदस्या विशेष प्रयत्नशील आहेत.