*अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारतर्फे भरीव मदत करणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

81
Adv

*आत्महत्या केलेल्या मोहाडीमधील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना ना. रामदास आठवलेंनी केली 1लाखाची सांत्वनपर मदत*

अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली आहेत.त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शेतांचे त्वरित पंचनामे करावेत. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना राज्य आणि केंद्र सरकार तर्फे भरीव मदत करणार तसेच अवकाळीग्रस्तांना मदत मिळण्यासाठी नियमात शिथिलता आणण्याची सूचना आपण केली आहे.त्यासाठी पंतप्रधान कार्यालय; गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहिले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे.

आज त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नाशिक मधील इगतपुरी; निफाड; ओझर ;दिंडोरी या तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्याना मदत करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातुन निधी द्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावातील संजय भास्कर देशमुख या 48 वर्षांच्या शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या केली.त्यांच्या घरी ना. रामदास आठवले यांनी आज भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत केली. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलास शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे; काकासाहेब खंबाळकर;डॉ विजय मोरे; राजेंद्र गुप्ता;चंद्रशेखर कांबळे; हेमंत रणपिसे; नगरसेवक सुनिल रोकडे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यसरकार ने अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जाहीर केलेला निधी अपुरा असून त्यात वाढ करण्याची आपण सुचना राज्यसरकार ला केली आहे.असे ना रामदास आठवले म्हणाले.
नाशिकमध्ये भातशेती; द्राक्षे;कांदे; पालेभाज्या या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी घोटी येथील भात शेती; तसेच दिंडोरी आणि ओझर येथे द्राक्ष शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

या नंतर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या समवेत नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेतली . यावेळी आमदार देवयानी फरांदे; आमदार सीमाताई हिरे; खासदार भारती पवार; आमदार डॉ राहुल अहिर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Adv