पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्वबाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणारअसल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ म्हैसेकरयांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नरतालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यावेळी सहाय्यकजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबरावगायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल,उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय कृषीअधिकारी संगीता माने, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी,जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आंबेगावचेगटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जुन्नरचे गटविकास अधिकारीविकास दांगट, तालुकाकृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, टी. के. चौधरी, सतीश शिरसाट उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकरम्हणाले,पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 74हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, त्या खालोखाल सांगलीजिल्ह्याला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे, सांगलीजिल्ह्यात द्राक्ष-डाळिंबाचे, सातारा जिल्ह्यात भाताचे तरपुणे जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन,भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्यासर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणारअसून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल.
जिओ टॅगिंगचा वापर
शेतकऱ्यांना विमाकंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटोकाढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्याअधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचनादेण्यात आल्या आहेत
रब्बीसाठी तातडीने कर्ज
अतिवृष्टीमुळेशेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बीहंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठीबँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनीसांगितले.
डॉ. दीपक म्हैसेकरयांनी आज खेड तालुक्यातील वडगाव (घेनंद)येथील संपत भिकू बवले, ज्ञानेश्वर बवले, रामचंद्र मधुकर कुलकर्णी, बबन नरहरी घेनंद-पाटीलयांच्या शेतातील कोबी, मका, सोयाबीन,भुईमूग, बीट या पिकांच्या नुकसानीची पहाणीकरून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पहाणी केली. एकलहरे गावातीलप्रमोद ढमाले यांच्या शेतीची पाहणी केली.
जुन्नरतालुक्यातील सावरगाव-आर्वी येथील शांताराम कोरडे, पिंपळगावतर्फे नारायणगाव येथील विठ्ठल खांडके, हिराबाई खांडके,गुंजाळवाडी येथील तुळशीराम ढवळे यांच्या शेतीची पाहणी केली.