सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. (जिल्हा परिषदा अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) ( पदाचे आरक्षण व निवडणूक) निवडणूक 1962 मधील नियम 2 (फ) यातील तरतुदीनुसार सातारा जिल्ह्यामधील 11 पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्याकरिता 13 जानेवारी 2020 पासून पुढील कालावधीकरीता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम 11 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पंचायत समितीमधील विद्यमान सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले आहे.
सभापती व उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. त्याबाबतच्या बैठकीची सूचना जिल्हाधिकारी सातारा यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी पंचायत समिती सदस्यांना देतील, असेही प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
Home Uncategorized पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम 11 डिसेंबर रोजी लोकप्रतिनिधी उपस्थित...