सातारा जिल्यातील पाचगणी महाबळेश्वर जाणाऱ्या पसरणी घाटात 16 no च्या स्टॉप च्या शेजारी शिवशाही व ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्स रस्त्याच्या मद्यभागी पलटी झाल्याने प्रवाशांचा एकच कल्लोळ झाला व त्यात ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी रुग्णवाहिकेद्वारे दाखल केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की MH.06 .BW.3575 ही शिवशाही बस वाई कडून महाबळेश्वर कढे पाचगणी घाटातून जात असताना 16 no बस स्टॉप वर पोचली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हर्स क्रमांक MH 11 L 5999 हिने जोराची धडक दिल्याने व चालकाचा ताबा सुटल्याने धडक होताच ट्रॅव्हल्स रस्त्यातच पलटी झाल्याने त्यातील प्रवासी एक मेकांच्या अंगावर पडून पुरुष महिला व लहान मुले गंभिररित्या जखमी झाले आहेत. प्रथमदर्शनी हा आकडा 25 ते 30 असा जखमी झाल्याचा समजत आहे. या अपघाताची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळताच ते आपल्या फौज फाट्यासह पोहचून जखमींना खिडकीतून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी वाईतील रुग्णालयांमध्ये पाठवले आहे हा अपघात एवढा भीषण झाला की त्या मध्ये दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .