आगाशिवनगर-मलकापूर येथे बुधवारी रात्री युवकाचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना घडली. रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर येथील जॅकवेलकडे जाणा-या रस्त्यावर हा खून झाला.
विकास रघुनाथ लाखे (रा. दांगटवस्ती मलकापूर)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या लोकांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये सुमारे चार ते पाच गोळ्या विकास लाखे याला लागल्या. गोळीबारानंतर विकास लाखे याला तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव दाखल झाले. टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे आगाशिवनगर मलकापूरला मोठा तणाव निर्माण झाला आहे.