निलेश मोरे यांच्या कल्पकतेचे खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी कौतुक करत सर्वसामान्यांसाठी हि दिनदर्शिका उपयुक्त असून सातारा जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे काम या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहचणार आहे. असे कौतुकोद्गार खा.डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी काढले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची इत्यंभूत माहिती देणारी दिनदर्शिका सातारा जिल्हातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असा मानस यावेळी सातारा शहरप्रमुख व वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी व्यक्त केला.
जनतेला कशी व कोणत्या प्रकारची वैद्यकीय सेवा दिली जाते,याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणार आहे. गरजू लोकांना या योजनेचा निश्चितच लाभ होईल,असा विश्वास निलेश मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना सातारा शहर मधील पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रकाशन प्रसंगी सातारा शहरसंघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, अजिंक्य रजपूत, विक्रम यादव, अमोल खुडे, शुभम भिसे (उपशहरप्रमुख,सातारा) दिपक चव्हान (वैद्यकीय -जिल्हाप्रमुख,सातारा) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष-ठाणे शहरप्रमुख निखिल जगताप,निलेश वाघमारे (उद्योजक सातारा),स्वराज जाधव, संकेत नवघने, ओंकार बर्गे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते…