भारतामध्ये दुचाकी अपघातामध्ये योग्य सुरक्षेअभावी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे . स्वयं सुरक्षा हा स्वयंप्रेरणेचा भाग आहे . दुचाकी प्रवासात हेल्मेट सुविधा असलीच पाहिजे असे मत सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी व्यक्त केले .
जिल्हा सुरक्षा समिती सातारा, प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा व पोलीस विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 35 वे रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन समारंभ मा.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा,आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा,विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते .
मा. विनोद चव्हाण, म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे,असे त्यांनी सांगितले.लहान मुलांनी ही आपल्या पालकांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करावे.
कॅप्टन के श्रीनिवासन प्राचार्य सैनिक स्कूल सातारा यांनी वाहन चालवीताना काळजी पूर्वक चालवीने गरजेचे असल्याचे सांगत आपल्या आयुष्यात आलेले गंभीर प्रसंग सांगितले. त्यामुळे आपण वाहन चालवीतना आपल्या बरोबर इतरांची काळजी घेऊन वाहतूक नियम पाळावे.उपक्रमाबद्दल त्यानीं आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी वाहतूक मित्र मधुकर शेम्बडे,ऑटो डील्सर अससोसिएशन पिसाळ यांनी मार्गदर्शन केले. सैनिक स्कूल मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.