Friday, July 31, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City हेगडे फूड प्रॉडक्ट्सच्या बासुंदीवर ग्राहकाचा गंभीर आरोप

हेगडे फूड प्रॉडक्ट्सच्या बासुंदीवर ग्राहकाचा गंभीर आरोप

517
Adv

शुक्रवार पेठेतील हेगडे फूड प्रॉडक्ट्स येथून खरेदी केलेल्या बासुंदीमधून दुर्गंधी येत असल्याचा गंभीर आरोप करत ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
महादरे (ता. जि. सातारा) येथील राहुल आनंदराव जाधव यांनी ३० जुलै रोजी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सातारा यांच्याकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, त्यांनी दुपारी सुमारे १२.४५ वाजता हेगडे फूड प्रॉडक्ट्समधून बासुंदी व सिताफळ रबडी खरेदी केली. मात्र, संबंधित बासुंदीच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख (Manufacturing Date), एक्सपायरी तारीख (Expiry Date) तसेच वापरलेल्या घटकांची माहिती नमूद नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, दुकानात याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. घरी नेल्यानंतर बासुंदीमधून उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित उत्पादनाचे नमुने तपासावेत व दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन पुढे कोणती कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Adv