Monday, October 26, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City रक्षक प्रतिष्ठानतर्फे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकासाठी ५० हजारांचे बक्षीस!

रक्षक प्रतिष्ठानतर्फे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकासाठी ५० हजारांचे बक्षीस!

62
Adv

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये गड-किल्ल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सदरबाजार, वॉर्ड क्रमांक २, ३ आणि ४ मधील किल्लेप्रेमींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येकी १० हजार रुपयांची तीन बक्षिसेही दिली जाणार आहेत.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
नोंदणीची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर २०२६ असून, किल्लेप्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

Adv