Tuesday, October 27, 2026
spot_img
Home Satara District Maan शिवाजीराव शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर? मकरंद पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

शिवाजीराव शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर? मकरंद पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

148
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा : मंत्री जयकुमार गोरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवाजीराव शिंदे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गोंदवले येथील जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई हेही यावेळी उपस्थित होते.
शिवाजीराव शिंदे यांच्या या भेटीमागील नेमके राजकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांच्या या भेटीमुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

आता शिवाजीराव शिंदे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv