Saturday, October 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City घोषणा स्वच्छतेच्या, पण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य!

घोषणा स्वच्छतेच्या, पण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य!

38
Adv

सातारा : राजवाडा चौक परिसरातील चौपाटीधारकांकडून दररोज रात्री प्लास्टिकच्या बाटल्या, भांडी धुतल्यानंतरचे घाण पाणी थेट रस्त्यावर ओतले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता पसरत असून, परिसरातील नागरिक आणि ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

चौपाटीवरील व्यवसाय संपल्यानंतर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडण्याऐवजी घाण पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असेल, तर ही बाब गंभीर आहे. सार्वजनिक रस्ते म्हणजे सांडपाणी वाहून नेण्याची जागा नव्हे, याचे भान संबंधित व्यावसायिकांनी ठेवणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अशी अस्वच्छता दिसत असेल, तर शहरातील इतर भागांच्या स्वच्छतेची स्थिती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सातारा पालिकेकडून अशा प्रकारांवर कारवाई केली जात असल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कायमस्वरूपी बदल होताना दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रात्रीच्या वेळी नियमित तपासणी, संबंधितांना नोटिसा आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.रोज रात्री रस्त्यावर घाण पाणी ओतले जात असताना सातारा पालिका ठोस कारवाई कधी करणार? की नागरिकांनी अस्वच्छतेचा हा त्रास असाच सहन करायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.

Adv