Monday, October 26, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District दुष्काळग्रस्त परिस्थितीचे भान; उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा...

दुष्काळग्रस्त परिस्थितीचे भान; उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय!

49
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्रातील सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून दुष्काळग्रस्तांना शक्य तेवढी मदत करण्याचा संकल्प अ‍ॅड. बनकर यांनी व्यक्त केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाच्या उत्सवापेक्षा गरजू नागरिकांना मदत करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी या निर्णयातून दिला आहे.
यंदा वाढदिवसानिमित्त कोणताही सार्वजनिक अथवा वैयक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे समर्थक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्सव आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंच्या मदतीला प्राधान्य देण्याचा अ‍ॅड. बनकर यांचा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण मानला जात आहे. संकटाच्या काळात समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

Adv