Friday, October 30, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा पुढाकार; बावनकुळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक!

रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा पुढाकार; बावनकुळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक!

59
Adv

रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना भेडसावणाऱ्या शासकीय स्तरावरील अडचणी दूर करण्यासाठी संस्थेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीत संस्थेच्या विविध शाखांच्या समस्या तसेच त्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीस रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी आमदार बाळाराम पाटील आणि संस्थेचे सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यभरातील विविध शाखांमध्ये शैक्षणिक कामकाज करताना काही शासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचे निराकरण होऊन संस्थेचे शैक्षणिक कार्य अधिक सुरळीतपणे सुरू राहावे, यासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नांना शासकीय स्तरावर मार्ग मिळावा, यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Adv