Wednesday, October 28, 2026
spot_img
Home Maharashtra|Uncategorized हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप

हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप

5
Adv

सातारा | सातारानामा
पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाने सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला अकरावे आमदारपद मिळाले असून, जिल्ह्यातून विधानसभेच्या राजकारणात प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या युवा महिला आमदार ठरल्या आहेत

या निवडणुकीत भाजपने विजयासाठी मोठी राजकीय ताकद पणाला लावली होती. आमदार, खासदार, मंत्री आणि प्रभारी अशा तब्बल ३० जणांची फौज मैदानात उतरवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एवढी मोठी यंत्रणा उभी करूनही अपेक्षित यश मिळवता आले नाही, तर दुसरीकडे हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठ्या नेत्यांची फौज, तरीही निकालाने दिला धक्का!

राजकीय वजन, नेत्यांची प्रतिष्ठा आणि संघटनात्मक ताकद यांच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, असा समज या निकालाने खोटा ठरवला का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याच्या दाव्याला मतदारांनीच आव्हान दिले का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात नवी राजकीय ऊर्जा मिळाली असून, भाजपच्या रणनीतीचेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तब्बल ३० जणांची प्रभारी फौज असूनही विजय हुलकावणी देत असेल, तर केवळ नेत्यांची गर्दी पुरेशी नसते; मतदारांचा विश्वास जिंकणे अधिक महत्त्वाचे असते, हा संदेश या निकालातून समोर येत आहे.

Adv