राष्ट्रवादीच्या कोर कमिटी जिल्ह्यातील नेत्यांना डावलले

139
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्राची कोर कमिटी स्थापन केली असून या कोर कमिटीतून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावले आहे जरी कोर कमिटी चा निर्णय घ्यायचा अधिकार राष्ट्रवादी पक्षाचा असला तरी जिल्ह्यातील नेत्यांना डावले असल्याची खदखद कार्यकर्त्यांच्या मनात होत आहे

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आता या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी विधान परिषद सभापती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्यसभा खासदार नितीन पाटील आमदार सचिन पाटील असे दिग्गज मंडळी असताना पक्षाने स्थापन केलेल्या कोर ग्रुप कमिटीत या मान्यवरांना स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

नाराज असलेले माजी मंत्री छगनराव भुजबळ यांचा या कमिटीत तर दुसरे मंत्रिमंडळातून दूर ठेवलेले दिलीपराव वळसे पाटील यांचाही या कमिटीत समावेश केला गेला आहे मात्र सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनाच कमिटी तून बाहेर ठेवल्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेचे राजकारण हेच म्हणावे का असा प्रश्न उपस्थित होत आहे

Adv