Friday, July 31, 2026
spot_img
Home Satara District Patan खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

181
Adv

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. या धरणाच्या जलाशयाचा पूर्वी ‘शिवाजी सागर’ असा एकेरी उल्लेख होत असल्याने तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाला साजेसा नसल्याची भूमिका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातत्याने मांडली होती.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, ज्या धर्तीवर ‘शिवाजी टर्मिनस’चे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करण्यात आले, त्याच धर्तीवर कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असून त्यास तातडीने मान्यता देण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-महायुती सरकारने ‘शिवाजी सागर’ या नावाऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याला, राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला वाहिलेली कृतज्ञ मानवंदना मानला जात आहे. राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले जात आहे.

Adv