Monday, September 14, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गणेश आगमन सोहळा नियोजनासाठी उद्या महत्त्वाची बैठक

गणेश आगमन सोहळा नियोजनासाठी उद्या महत्त्वाची बैठक

314
Adv

आगामी गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळा मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी सातारा शहर पोलीस व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने उद्या, शुक्रवार (दि. 31 जुलै) सायंकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र, सातारा येथे होणार असून, मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशानुसार आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक, सुरक्षा, मिरवणूक मार्ग, शिस्तबद्ध नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत चर्चा केली जाणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित प्रतिनिधींनी बैठकीस वेळेत उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे,

असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Adv