Friday, July 31, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारानामाच्या वृत्तानंतर प्रशासन जागे; बिल्डरला ७ दिवसांचा अल्टिमेटम

सातारानामाच्या वृत्तानंतर प्रशासन जागे; बिल्डरला ७ दिवसांचा अल्टिमेटम

114
Adv

शुक्रवार पेठ परिसरातील बांधकामामुळे गटारामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य पडून गटार तुंबल्याची बातमी सातारानामाने ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित बिल्डरला नोटीस बजावली आहे.
बांधकाम साहित्यामुळे सांडपाण्याचा निचरा अडल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातारानामाने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून गटारातील अडथळे हटविण्याचे आदेश दिले.
पालिकेने संबंधित बिल्डरला सात दिवसांच्या आत गटारावरील सर्व बांधकाम साहित्य हटवून गटार पूर्ववत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पुढील नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील दुर्लक्षित प्रश्नाला वेग आला असून, गटारातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारानामाच्या वृत्तामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई सुरू केल्याबद्दल शुक्रवार पेठेतील स्थानिक नागरिकांनी सातारानामाचे अभिनंदन करत जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Adv